मराठे म्हणवणारी नेते आता लोकांची माथी भडकावतय ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ ऑक्टोबर २०२३

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपत आली तरी अद्याप सरकार आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकलेले नाही. त्याउलट सरकारमधील काही लोक जरांगे – पाटील यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करू लागल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला. दरम्यान, स्वतःला मराठे म्हणवणारी नेते मंडळी लोकांची माथी भडकावत आहेत, असे सांगत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.

मुंबईत पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. ते पुढे म्हणाले, एक महिन्यात तीन गरीब मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. परंतु, शिंदे – फडणवीस सरकारच्या डोळ्याची पापणीही हलली नाही. मग हे सरकार कशासाठी आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तुम्ही तिथे बसवलेले मराठा मुख्यमंत्री आहात ? मराठ्यांच्या मतांसाठी भाजपने तुम्हाला तिथे बसवले आहे. मग तुम्ही करताय काय ? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची नुसती फोटोबाजी सुरू आहे. लोक आत्महत्या करत आहेत आणि हे लोक जाहिरातबाजी करत आहेत. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासाठी लोक आत्महत्या करत आहेत. भविष्यात हे लोण पसरत जाईल, अशी भीती व्यक्त केली. तसेच राज्यात दिवाळीआधी वातावरण बिघडू शकते, असेही राऊत म्हणाले. छगन भुजबळ लोकांना भडकवत आहेत. शिंदे गटातले काही स्वतःला ९६ कुळी मराठा म्हणवणारे नेते लोकांना भडकवत आहेत. आम्ही मराठा आहोत, कुणबी नाही, त्यामुळे कुणबी जात प्रमाणपत्र घेणार नाही, असे म्हणत आहेत. तर भाजपचे केंद्रातले मंत्री वेगळीच भाषा बोलत आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम