मुख्यमंत्री शिंदे मोदी यांच्या सांत्वनासाठी गुजरातला रवाना

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० डिसेंबर २०२२ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. त्यानिमिताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोदी यांची भेट घेण्यासाठी आता गुजरातला जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं आज सकाळी साडे तीनच्या सुमारास निधन झालं. श्वसनाचा त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. आपल्या आईवर अंत्यसंस्कार झाल्यावर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं काम सुरू केलं आहे.दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदी यांच्या सांत्वनासाठी गुजरातला रवाना होणार आहेत. विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर शिंदे अहमदाबादसाठी निघणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कामकाजाला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनचं त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम