
‘आदिपुरुष’च्या अभिनेत्याकडे इतकी आहे मालमत्ता !
दै. बातमीदार । ५ जून २०२३ । देशातील अनेक अभिनेत्यासह अभिनेत्री नेहमीच आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. व ते सातत्याने सोशल मिडीयावर देखील आपल्या खाजगी आयुष्यातील क्षण व्हायरल करीत असल्याने त्यांचे चाहते देखील त्यांच्यावर कॉमेंटचा पाऊस पाडत असतात. असाच एक अभिनेता ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. सध्या अभिनेता प्रभास त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. तो देशातील सर्वात महागडा स्टार समजला जातो. प्रभास लोकप्रिय अभिनेत्यासह भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. हैदराबादमधील आलिशान घरासह त्याच्याकडे करोडोंची मालमत्ता आहे.
सध्या तो अनेक प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. नुकतेच त्याने हैदराबादच्या बाहेरील भागात 5 एकरची जमीन खरेदी केली आहे. याठिकाणी तो अभिनेता सलमान खानप्रमाणे आलिशान फार्महाऊस बांधणार असल्याचे म्हंटले जात आहे.
प्रभासची नवीन जागा एका भव्य टेकडीच्या शिखरावर आहे जिथून संपूर्ण हैदराबाद शहराचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेता येतो. विश्रांतीसाठी तो याठिकाणी जाणार आहे. विशेष म्हणजे या नव्या जागेची त्याने पूर्ण माहिती घेतली आहे. अनेकदा कामातून वेळ काढून तो या जागेची पाहणी करण्यासाठी देखील जातो. ज्युबली हिल्सच्या पॉश भागात एक आलिशान बंगलादेखील आहे.
प्रभासचा ज्युबली हिल्समध्ये एक भव्य बंगला आहे. जी ८४ एकर मध्ये बांधण्यात आला आहे. या बंगल्याची किंमत १०५ करोड रुपये आहे. त्याच्या घरामध्ये लक्झरी सुविधांचा समावेश आहे, ज्यामध्ये स्विमिंग पूल, गार्डन आणि जिमचा समावेश आहे. प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सध्या तो त्याच्या आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात प्रभाससह क्रिती सेनन, सैफ अली खान आणि सनी सिंग हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम