जिल्हा अस्थीरोग असोसिएशन तर्फे गुरुवारी जीवनरक्षक, प्रथमोपचार प्रशिक्षण

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०२ ऑगस्ट २०२२ । जळगाव येथील जळगाव जिल्हा अस्थिरोग असोसिएशनतर्फे गुरुवार दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता एम.जे.कॉलेज येथे विद्या विद्यार्थ्यांना जीवनरक्षक व प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

भारतीय अस्थीरोग संघटनेतर्फे दरवर्षी ४ ऑगस्ट रोजी देशभरात अस्थी व सांधे आरोग्य दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षी संघटनेतर्फे “प्रत्येकाने रस्ते अपघातातील एक जीव वाचवावा” या संकल्पनेवर जनजागृती करण्यात येत आहे. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान प्रशिक्षणातून ही जनजागृती करण्यात येत आहे.
विविध संस्थांना या प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करावयाचे असल्यास अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे, महेश प्रगती कार्यालयासमोर, रिंगरोड किंवा सचिव डॉ. भूषण झंवर माहेश्वरी बोर्डिंग जवळ, प्रताप नगर, जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम