Twitter वर आले ‘लाइव्ह ट्विटिंग’ फिचर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार I ५ डिसेंबर २०२२ I ट्विटरवर हे नवीन फीचर लाईव्ह करण्यापूर्वी इलॉन मस्क यांनी स्वत: युजर्सना याबाबत माहिती दिली.मस्क यांनी ट्विट केले की, लाइव्ह ट्विटिंग फीचर आता प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्टीव झालं आहे. ट्विटरवरील ‘लाइव्ह ट्विटिंग’ फीचरच्या माध्यमातून यूजर्स ट्विटरवर सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान सहज ट्विट करू शकतील. तसेच वापरकर्ते त्यांचा ट्विट थ्रेड इव्हेंटच्या मध्यभागी जोडू शकतात आणि व्ह्यू मिळवू शकतात.

इलॉन मस्क मायक्रो-ब्लॉगिंग साइटवरील कंटेट बदलाबाबत युजर्सकडून सल्ला देखील घेत आहेत. ट्विटरवर अनेक युजर्सनी कॅरेक्टर लिमिट, व्हर्च्युअल जेल आणि फ्री स्पीच संदर्भात विविध सूचना दिल्या आहेत. लेखक मॅट टॅबी हे लाइव्ह ट्विटिंग फीचर वापरणारे पहिले ट्विटर युजर बनले आहेत.

ट्विटरवर एका युजरने इलॉन मस्कला व्हर्च्युअल जेल बनवण्याचा सल्ला दिला आहे. जर कोणत्याही युजर्सने कंपनीची पॉलिसी किंवा नियम तोडले, तर त्या लोकांच्या प्रोफाईलवर जेल आयकॉन येईल आणि ते ट्विटरच्या व्हर्च्युअल जेलमध्ये गेल्यानंतर ट्विट करू शकणार नाहीत, तसेच इतर कोणत्याही ट्विटवर लाईक किंवा कमेंट करू शकणार नाहीत.

एका वापरकर्त्याने मस्कला ट्विटरची शब्द मर्यादा 1,000 पर्यंत वाढवण्याची सूचना केली, त्यावर मस्क म्हणाले की ते आमच्या यादीत आहे, त्यावर विचार केला जाईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम