
दै. बातमीदार । २८ नोव्हेबर २०२२ । देशातील चीनमध्ये आता कोरोनाने डोकेवर काढल्याने सरकारने लॉकडाऊन केल्याने त्याच्या विरोधात लोक रस्त्यावर येत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणीही करत आहेत.
चीनमधील झीरो कोविड पॉलिसीविरोधात लोक रस्त्यावर आले आहेत. बीजिंगपासून सुरू झालेली ही निदर्शने आता 9 प्रमुख शहरांमध्ये पोहोचली आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिस लाठीचार्ज करून लोकांना अटक करत आहेत, मात्र लोकांचा रोष संपलेला नाही. रविवारी रात्रभर लोकांनी रस्त्यावर निदर्शने सुरूच ठेवली.
यादरम्यान लोक लॉकडाऊन हटवून स्वातंत्र्य देण्याची मागणी करत घोषणा देत आहेत. आंदोलक म्हणाले- आम्हाला प्रेस स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य हवे आहे. आम्हाला आमचे स्वातंत्र्य द्या, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणीही लोक करत आहेत.
चीनमध्ये कोरोना सातत्याने वाढत आहे. 27 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे 40 हजार रुग्ण आढळले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. आता चीनमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे गेली आहे. यामुळे शी जिनपिंग सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. कडक लॉकडाऊनमुळे 66 लाख लोक घरात कैद आहेत. हे लोक खाद्यपदार्थांसाठीही घराबाहेर जाऊ शकत नाहीत. रोजच्या कोविड चाचणीमुळेही नाराजी वाढत आहे. शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम