.लोंढवे माध्यमिक विद्यालयातील ३०० मुलांची मोफत नेत्रतापसणी.. विप्रो कंझुमर्स केयर आणि आधार बहुउद्देशीय संस्थेची संयुक्त मोहीम..
अमळनेर (प्रतिनिधी) विप्रो कंझुमर्स केयर आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त मोहिमेतून तालुक्यातील लोंढवे येथील स्व आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात ३०० मुलांची मोफत तपासणी करण्यात आली. अंदाजे ६० मुलांना दृष्टी दोष आढळला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
विप्रोचे जनरल मॅनेजर विजय बागनिलेवाले, वेल्फेयर ऑफिसर सुधीर बडगुजर, स्टोअर परचेस मॅनेजर मिलिंद मरकंडे, अकाउंट मॅनेजर आनंद निकम, डॉ. पंकज पाटील, आधार संस्थेच्या डॉ. भारती पाटील, रेणुप्रसाद, दीप्ती गायकवाड, मोहिनी पाटील, निकिता पाटील, नंदिनी मैराळे, मयूर गायकवाड, जितेंद्र पाटील आदींनी ग्रामीण भागातील सुमारे ५ हजार मुलांची मोफत तपासणी करून दृष्टीदोष असणाऱ्याना उपचार व चष्मा मोफत वाटप सुरू केले आहे.
ग्रामीण भागात मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
ग्रामीण भागात पालक आणि मुले स्वतः आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून आले. अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे तपासणी करत नाहीत व मुले चष्मा लावायची लाज वाटते म्हणून सांगत नाहीत. किमान लोंढवे शाळेत ६० ते ८० मुलांना चष्मा वाटप व नेत्र उपचार सुरू आहेत. मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी विप्रो व आधार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम