‘या’ देशात लाभते दीर्घआयुष्य !
बातमीदार | ८ सप्टेंबर २०२३ | वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे माणसाचे सरासरी आयुर्मान वाढत चालल्याचे दिसत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने केलेल्या एका सर्वेक्षणातून असे आढळून आले आहे की, जगभरातील सर्व देशांमधील माणसांचे सरासरी आयुष्य एकसारखे नाही. काही देशांमध्ये ते जास्त, तर काही देशांमध्ये कमी आहे; परंतु जर सरासरीचा विचार केल्यास सध्या माणसांचे आयुष्य ७७ वर्षे एवढे आहे.
जगात काही देश असे आहेत की, ज्या देशांमधील लोक दीर्घायुषी आहेत, अशा देशांच्या यादीतील पहिले नाव आहे मोनॅको या देशाचे मोनॅकोमधील दर तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती करोडपती आहे. येथील लोकांची खाद्यसंस्कृती उर्वरित जगाहून वेगळी आहे. त्यामुळेच या देशातील लोकांचे सरासरी आयुष्य ८९ वर्षे आहे. दीर्घायुषी लोकांच्या देशांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे
हाँगकाँग येथील लोकांचे सरासरी आयुष्य ८५ वर्षे आहे. हाँगकाँगमध्ये उत्तम पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. तसेच रोजगाराचे पर्याय मुबलक आहे. त्यामुळे या देशातील लोक समाधानाने जगतात. त्यांना कोणत्याही प्रकारच्या ताणतणावाचा सामना करावा लागत नाही. मकाऊ हा देश या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशातील लोकांचे सरासरी आयुष्य ८४ वर्षे आहे. मकाऊमधील वैद्यकीय सुविधा जगातील उत्तम मानली जाते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम