महाविकास आघाडी २०२४ मध्ये असेल का ? शरद पवार स्पष्टीकरण

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ एप्रिल २०२३ ।  राज्यात महाविकास आघाडीसोबत त्यातील नेत्यांची अनेक दिवसापासून मोठी चर्चा रंगली आहे. येणाऱ्या काळात राज्यात देखील निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी येत्या २०२४ मध्ये टिकणार का ? असा प्रश्न निर्माण झाल्याने यावर नेते शरद पवार यांनी उघडपणे बोलले आहे.

शरद पवारांच्या कालच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या फुटीची पुन्हा चर्चा सुरू झाली होती. मात्र, अखेर सावध होत शरद पवार यांनी या चर्चेला आज स्वल्पविराम दिला. 2024 च्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सोबत लढेल काय? आणि यात वंचित आघाडी पण एकत्र येईल का, असा प्रश्न पत्रकारांनी काल शरद पवार यांना विचारला होता. यावर पवार यांनी वंचित आघाडीशी आमची चर्चाच झालेली नाही. वंचित आघाडीसोबत जी चर्चा झाली, ती फक्त कर्नाटकातल्या मर्यादित जागांशिवाय दुसरी कसलिही नाही. आणि बाकी आता आम्ही एकत्र लढणार वगैरे. आज आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे. पण इच्छाच फक्त पुरेशी नसते. जागांचे वाटप. त्यातले काही इश्यू आहेत की नाही. हे अजून केलेच नाही. तर कसे सांगता येईल, असे उत्तर दिले होते. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत महाविकास आघाडी फुटणार का, याची चर्चा सुरू होती.

पवारांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी फुटणार की काय, अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा शरद पवार यांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, असे स्पष्टीकरण आज दिले. पवार म्हणाले की, महाविकास आघाडीत अजून जागावाटप निश्चित नाही. मात्र, मविआ टिकून रहावी हा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी पवारांनी आपल्या वक्तव्यावरून सुरू झालेली चर्चा आणि डॅमेज कंट्रोल थांबण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पुढे खरेच काय होणार, याची उत्सुकता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम