महाराष्ट्र बंदचा इशारा ? महाविकास आघाडीची बैठक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ नोव्हेबर २०२२ । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सतत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं आणि आधी सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधकांसह शिंदे गटातील नेत्यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका होत असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण मार्गाने महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत.

राज्यपालांना राज्यातून हटवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदमध्ये ठाकरे गटासह मित्र पक्षांनीही सहभागी व्हावे यासाठी आता खासदार संजय राऊत यांनी प्रयत्न केलेत. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केल्याचेही राऊत यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्र बंदमध्ये ताकद दाखवण्यासाठी महाविकास आघाडीची आता मदत घेतली जाणार आहे. महाराष्ट्र बंदमध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असणार असून हे आंदोलन होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम