अभिनेत्री अमृता खानविलकरला महाराष्ट्राने घेतले डोक्यावर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जानेवारी २०२३ । झी टॉकीज वाहिनीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्काराची नामांकने मागविली होती यात भरपूर अभिनेत्रींनी नामांकने दिली होती. पण गेल्या वर्षभरात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या मराठी सिनेमांची लोकप्रियता तर बॉक्स ऑफीससवरील कमाईत दिसलीच पण आता महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री कोण हे जाणून घेण्याची. अखेर हे नाव समोर आलं आहे.

झी टॉकीज वाहिनीतर्फे १५ डिसेंबरला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्काराची नामांकने दणक्यात जाहीर झाली. यामध्ये महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री कोण या विभागात अभिनेत्री अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, हृता दुर्गुळे, रितिका श्रोत्री आणि वैदेही परशुरामी यांच्यात चांगलीच चुरस रंगली. अखेर हा बहुमान अमृताला मिळाला आणि ती ठरली महाराष्ट्राची फेवरेट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री.. अमृता खानविलकर हिची चंद्रमुखी या सिनेमातील चंद्रा ही भूमिका महाराष्ट्राची फेव्हरेट कोण या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आली होती. लेखक विश्वास पाटील लिखित चंद्रमुखी या कादंबरीवर बेतलेल्या या सिनेमातील अमृताची भूमिका तिच्या आयुष्यातील माइलस्टोन ठरली.

आजपर्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसलेल्या अमृताने चंद्रमुखी ही व्यक्तीरेखा साकारत लावणी, तमासगीर कलावंतीणीचं आयुष्य, प्रेमासाठीची व्याकुळता दाखवण्यात सगळं कौशल्य पणाला लावलं. या सिनेमाने अमृताच्या अभिनय आणि नृत्यकलेचंही कौतुक झालं. त्यामुळे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब तिने पटकावला.
मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हा पुरस्कार सोहळा घेऊन यावर्षी पुन्हा एकदा झी टॉकीज ही वाहिनी रसिकांच्या भेटीला आली आहे. सिनेमा निर्मितीपासून सिनेमा प्रदर्शनापर्यंत आणि अनेक वैविध्यपूर्ण व प्रयोगशील कार्यक्रमाची नांदी सादर करणाऱ्या झी टॉकीज वाहिनीच्या पडदयावर काही दिवसांतच महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण पुरस्कार सोहळा प्रक्षेपित होणार आहे. नुकताच हा सोहळा चित्रित करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम