लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे ठरले मिशन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ मार्च २०२३ । राज्यात नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये चांगलाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे. एकत्र लढल्यामुळे भाजपला हरवू शकतो असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना झाला असून आगामी निवडणुका एकत्र लढण्याचं ठरवलं आहे.

लोकसभा निवडणूक लांबणीवर आहे पण आतापासूनच जागा वाटपासाठी तयारी सुरू झाली आहे. राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे आतापासूनच वारे वाहत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आला आहे. या महायुतीला हरवण्यासाठी महाविकास आघाडीत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांनी निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपाला आतापासूनच सुरुवात केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा निकष समोर ठेवत ठाकरे गट 21, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 19 अशाप्रकारच्या जागावाटपाचे सूत्र आघाडीच्या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली.

या बैठकीत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या सभा घ्यायची रणनिती ठरवण्यात आली आहे. या सभांमधून केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचं महाविकासआघाडीच्या नेत्यांनी ठरवलं आहे. या बैठकीनंतर वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये तीनही पक्षांच्या नेत्यांनी भाषणं केली. उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पंतप्रधानपदासाठी ठाकरे गट विशेषतः संजय राऊतांकडून उद्धव ठाकरे यांचं नाव चर्चेत आणलं जातं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु असते. उद्धव ठाकरे यांच्या भाषणावेळी एका उत्साही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने देश का पंतप्रधान कैसा हो, शरद पवार जैसा हो अशी घोषणा दिली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनीही काहीही हरकत नसल्याचं म्हणत महाविकासआघाडीच्या नेत्यांना एक सल्ला दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम