राज्यात महाविकास आघाडीची घोडदौड कायम तर दिग्गजांना धक्का !
दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२३ । राज्यातील बाजार समिती निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची घोडदौड कायम असून, भाजप आणि मिंधे गटाला जोरदार झटका बसला आहे. नगर जिल्हय़ात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा पालापाचोळा झाला आहे.
संगमनेरात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व कायम राहिले. येथे विखेंच्या उमेदवाराला केवळ एक मत मिळाले. सोलापूर जिल्हय़ातील कुर्डुवाडी बाजार समितीत मिंधे गटाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना भोपळाही पह्डता आला नाही. सांगली जिल्हय़ात भाजपचा सुपडासाफ झाला. भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. सांगली बाजार समितीत महाविकास आघाडीचे उमेदवार सर्व 17 जागावंर विजयी झाले. भाजपचा सुपडासाफ झाल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, माजी आमदार विलास जगताप यांना धक्का बसला आहे. z ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलने 18 पैकी 17 जागांवर विजय मिळविला. एक अपक्ष निवडून आला. भाजप आणि मिंधे गटाचा धुव्वा उडाला आहे.
महसूलमंत्रीपद मिळाल्यापासून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संगमनेरातील सत्तापेंद्र मिळविण्याचा प्रयत्न केला. बाजार समिती निवडणुकीत विखे प्रचारासाठी स्वतः फिरले. मात्र, सर्वच्या सर्व 18 जागा जिंकून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपले वर्चस्व कायम राखले. विखेंच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. विखेंच्या जनसेवा मंडळ पॅनलमधील सोमनाथ दिघे या उमेदवाराला तर अवघे एक मत मिळाले. राहुरी बाजार समितीत महसूलमंत्री विखे-पाटील, त्यांचे खासदार पुत्र सुजय विखे आणि माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या पॅनलला अवघ्या दोन जागा मिळाल्या. महाविकास आघाडीच्या पॅनलचे 16 उमेदवार निवडून आले. पारनेर बाजार समितीत सर्व महाविकास आघाडीचे 18 उमेदवार निवडून आले. भाजपला भोपळाही पह्डता आला नाही. कर्जतमध्ये महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या पॅनलला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. श्रीगोंद्यात भाजप आमदार पाचपुते यांच्या वर्चस्वाला सुरूंग लागला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम