नाशिक भाजपात मोठे फेरबदल ; मंत्री महाजनांचे जबाबदारी काढली ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ मे २०२३ ।  राज्यातील भारतीय जनता पार्टी गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या बैठकामधून मोठी उलठापालथ होत आहे. नुकतेच नाशिक जिल्ह्याची जबादारी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होती पण आता संघटनेची सूत्रे प्रभारीपद काढून घेत भाजपचे नंदुरबारमधील ज्येष्ठ नेते राजेंद्रकुमार गावित यांच्याकडे सोपविण्यात आल्याने नाशिक भाजपमध्ये मोठा धक्का मानला जात आहे.

त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राची संघटनात्मक जबाबदारी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच घोषणा केली. श्री. गावित आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. त्यांची नंदुरबारमध्ये शिक्षणसंस्था असून क्रीडा, साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. मितभाषी, पारदर्शक प्रतिमा आणि त्यांनी पक्षात केलेल्या पक्षाच्या निःस्‍वार्थ सेवेमुळे त्यांच्यावर नाशिकची जबाबदारी देत भाजपने एक नवा संदेश दिल्याचे मानले जात आहे. भाजप अधिकाधिक बहुजन चेहऱ्यांना संधी देत संघटना मजूबत करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे यातून दिसून येते.
मंत्री गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्या कार्यकाळात नाशिक महापालिकेत सत्ता येण्याबरोबरच संघटनात्मक पातळीवर पक्ष भक्कम करण्याची जबाबदारी त्यांनी प्रामुख्याने पार पाडली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही महाजन यांनी नाशिकवर कंट्रोल कायम ठेवला. राज्यात फडणवीस व शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर महाजन यांना मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आले. संघटनेचे प्रभारीपद मात्र कायम ठेवण्यात आले. त्यामुळे गिरीश महाजन कुठल्याही क्षणी नाशिकमध्ये येऊ शकतात, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. श्री. महाजन यांचा वाढदिवस असो किंवा गुजरात व कर्नाटकाच्या निवडणुका. महाजन जेथे असतील तेथे नाशिकहून पदाधिकारी जात होते. मात्र आता महाजन यांच्याकडे प्रभारीपदाची देखील जबाबदारी ठेवण्यात आलेली नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम