एसटी महामंडळाचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून मकरंद अनासपूरे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मे २०२३ ।   राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ सुंदर एसटी बस स्थानक नावाचा उपक्रम राबवला जात आहे. तो आणखी प्रभावीपणे राबविण्यात यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी महामंडळाच्या संदर्भात एक महत्वाची घोषणा केली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी, विनोदवीर मकरंद अनासपूरे यांची एसटी महामंडळाचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

मकरंद अनासपुरे यांच्या नावाची एसटी महामंडळाच्या सदिच्छादूत पदावर नियुक्ती झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. यासगळ्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आपल्याला मिळालेल्या नव्या जबाबदारीप्रती आनंद व्यक्त केला आहे. एसटीच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या मला माहिती आहेत. यापूर्वी अनेकदा शुटींगच्या निमित्तानं मी एसटीमधून प्रवास केला आहे. त्यामुळे नव्या जबाबदारीची भूमिका पार पाडताना त्याचा मला उपयोग होईल.

एसटी प्रवास हा कधीही न विसरता येणारा प्रवास आहे. हे मला आवर्जून सांगायला आवडेल. त्याच्या कित्येक आठवणी आहेत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जी घोषणा करण्यात आली आहे ती समाधानकारक आणि आनंदी आहे. एसटीसाठी जे काही करता येईल ते करण्यावर आपण भर देणार असल्याचे आणि प्रयत्न करणार असल्याची भावना मकरंद यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम