दै. बातमीदार । ९ मे २०२३ । राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळा सुरु झाला असून प्रत्येक व्यक्ती थंड ठिकाणी फिरण्याचा व थंड पेय पिण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतात. उन्हाळा म्हंटलं कि लक्षात येतो तो म्हणजे फळांचा राजा आंबा. उन्हाळ्यात थंड पेय किंवा आईस्क्रिम खाण्याची इच्छा ही होतच असते.
उन्हाळा म्हंटलं कि लक्षात येतो तो म्हणजे फळांचा राजा आंबा. उन्हाळ्यात थंड पेय किंवा आईस्क्रिम खाण्याची इच्छा ही होतच असते. उन्हाळ्यात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण जूस,आईस्क्रिम, फालुदा, कुल्फी यावर ताव मारतात. उन्हाळा हा आंब्याचा सीजन आहे. सर्वजण आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवत असतात. अश्यातच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आंबा कुल्फीची (मँगो कुल्फी) रेसिपी. त्यामुळे तुम्हाला आंबा आणि कुल्फी अश्या दोघांवरही ताव मारता येईल. तर वाचा आमची मँगो कुल्फी रेसिपी आणि आजच बनवून बघा.
१ लिटर दूध
१ चमचा कस्टर्ड पावडर
१ वाटी साखर
१ वाटी आंब्याचा रस
सर्वप्रथम दूध गरम करून ठेवावे व त्याला आटवून घेऊन एक बाउल मध्ये काढावे. त्या बाउल मध्ये दुधात कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यावी नंतर ते मिश्रण गरम दुधात घालून ते अजून ५ मिनिटे उकळून घ्यावे. त्यानंतर मिश्रण थंड झाल्यावर आंब्याचा रस मिक्स करून घ्यावा आणि तो ४ तास फ्रिज मध्ये ठेवावा. ४ तास झाल्यावर त्याला मिक्सर मधून ग्राइंड करून त्यात आवडीनुसार काजू बदामाचे काप घालून कुल्फी साच्यामध्ये सेट करावी.आणि परत ४ तास फ्रिज मध्ये ठेवावे. अशाप्रकारे तुम्ही थंडगार कुल्फी घरी बनवून त्याचा आनंद लुटू शकता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम