
पुलाचा कामामुळे गावाचा वैभवात मोठी भर – आमदार अमोल पाटील
पारोळा – तालुक्यातील मोंढाळे प्र.अ. येथे मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांतून व आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून मंजूर विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
याप्रसंगी शेतकी संघाचे संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, मा.जि.प.सदस्य रोहीदासदाजी पाटील, देवगांव सरपंच समीरदादा पाटील, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील, दळवेल सरपंच प्रविणआण्णा पाटील, पत्रकार विश्वासभाऊ चौधरी, करंजी सरपंच भैय्यासाहेब पाटील, मुंदाणे सरपंंच एकनाथ पाटील, भोलाणे सरपंंच शिवाजी पाटील यांचेसह मोंढाळे व परिसरातील गावांचे ग्रामपंचायत, विकासो व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसेना, युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
आज आपण गावात स्वातंत्र्य काळापासून न झालेली विकासकामे होतांना पूर्ण झालेली पाहत आहोत, या विकासकामांचा जोरावर आज मी आमदार म्हणून आपल्या समोर उभा आहे. नागरिकांचा समस्या जाणून, त्या मार्गी लागल्यानंतर जसा तुम्हाला आनंद वाटतो त्यापेक्षा अधिक आनंद हा आम्हाला देखील होतो. आज हा गावातील पुलाचे मी या ठिकाणी येण्याचा पूर्वी ड्रोनने टिपलेले छायाचित्र बघितले. ते बघून मीच काय, तर सर्वसामान्य माणूस देखील अचंबित होईल. या पुलाचा कामानंतर हा सभोवतालील परिसर डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. अगदी नयनरम्य वातावरण हे आपल्याला चांगल्या शहरात देखील अनुभवायला मिळणार नाही, ते आज मोंढाळे प्र.अ. येथे अवतरले आहे. त्यामुळे गावाचा वैभवात मोठी भर पडली आहे. गावातील आरोग्य सुविधा बळकट होण्यासाठी उपकेंद्राचे बांधकाम देखील आपण केले. शिक्षण, आरोग्य व दळणवळण यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा कश्या उपलब्ध करता येतील हा दृष्टीकोन समोर ठेवून हि कामे आज पूर्णत्वास आलेली आपण पाहत आहोत. येत्या काळात आपल्या गावातील मंडळींनी येथे मागणी केलेली कामे देखील आपण प्राधान्याने पुर्ण करण्याचे ठोस आश्वासन आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी आपल्या मनोगतातुन दिले.
मोंढाळे प्र.अ.येथे या कामांचे करण्यात आले लोकार्पण – १) रा.म.०६ ते हिवरखेडा रस्ता ग्रा.मा.४७ मोंढाळे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे – १.१५ कोटी, २) मोंढाळे प्र.अ. येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम करणे – ४३.८७ लक्ष, ३) मोंढाळे प्र.अ. येथे मारोती मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे – १५.०० लक्ष, ४) मोंढाळे प्र.अ. येथे श्रीमारोती मंदिराजवळ भक्तनिवास बांधकाम करणे – ०५.०० लक्ष व मोंढाळे प्र.अ. येथे गावांतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे – ३०.०० लक्ष

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम