पारोळा येथे महाराष्ट्र माळी समाज महासंघाची बैठक संपन्न

तालुकाध्यक्षपदी छोटू महाजन यांची निवड

बातमी शेअर करा...

पारोळा (प्रतिनिधी) येथे नुकतीच महाराष्ट्र माळी समाज महासंघाची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष रमेश महादू महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर जिल्हाध्यक्ष श्याम पाटील सर माजी जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील जिल्हा सरचिटणीस भास्कर पाटील समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बापू महाजन सर महाराष्ट्र माळी महासंघाचे सरचिटणीस रमेश विश्राम महाजन माजी तालुकाध्यक्ष वना दामू महाजन संचालक आबा भास्कर महाजन माळी महासंघाचे युवक तालुकाध्यक्ष छोटू महाजन उपस्थित होते

याप्रसंगी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीत सुरुवात झाली याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी सांगितले की सध्या 25 जानेवारी रोजी होणाऱ्या वधू वर उपवारांच्या परिचय मेळावा बाबत माहिती दिली व सांगितले की असे मिळावे होणे ही काळाची गरज आहे यामुळे समाजाचा वेळ वाचतो व अपेक्षित असलेले स्थळ शोधण्यास आपल्या व योग्य माहिती मिळते सर्व समाज आज प्रगतीच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे असे असताना वधु वर परिचय मेळावे ही संस्कृती रुजवणे ही काळाची गरज होऊन बसली आहे यानंतर जिल्हाध्यक्ष श्याम पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की समाजातील उपवर युवक युतींनी या परिचय मेळावा साठी नाव नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले या बैठकीत महाराष्ट्र माळी महासंघाचे नूतन तालुका अध्यक्ष म्हणून छोटू रामदास माळी यांची तालुकाध्यक्ष म्हणून नेमणूक करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले माजी तालुकाध्यक्ष वना महाजन यांना जिल्हा कार्यकारणीत घेण्यात आले या बैठकीत माळी समाजाला भूषणावह असलेली ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात लावली त्या त्याचं फलित म्हणून की काय आज माळी समाजातील एक मुलगी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील जॉर्ज मिशन युनिव्हर्सिटी एम एस इन कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमासाठी तिची निवड झाली त्याबद्दल महाराष्ट्र माळी महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष श्री शालिग्राम मालकर यांच्या हस्ते कु विनया बापू महाजन हिचा गौरव करण्यात आला

सदर बैठकीस माळी समाजातील बहुसंख्य समाज बांधव याप्रसंगी उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम