मानेंनी सांगितली सिंधुमाईंचा अनुभव अन रडू कोसळले !
बातमीदार | १३ ऑगस्ट २०२३ | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून दाखवण्यात येणार आहे. ही मालिका लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी या मालिकेचं प्रमोशन सुरु आहे. या मालिकेत किरण माने यांनी सिंधुताईच्या आयुष्यातला बापमाणूस अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे. किरण माने यांना नुकताच या मालिकेच्या प्रमोशनावेळी एक अनुभव आला, त्या भावुक क्षणाबद्दल किरण माने यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले आहे.
किरण माने, प्रिया बेर्डे असे अनेक लोकप्रिय कलाकार ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत आहेत. सिंधुताई माझी माई मालिकेच्या प्रमोशनमध्ये एक असा प्रसंग घडला त्यामुळे सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं.’मी दुसऱ्यांदा आई होणार होती, पण…’ राणी मुखर्जीनं दुःखी होऊन सांगितला प्रकारकिरण मानेंनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत प्रिया बेर्डे आणि सिंधुताईंची लेक ममताताईंच्या डोळ्यात पाणी दिसत आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “ऐ अंधेरे, देख ले मुंह तेरा काला हो गया…’माँ’ ने आंखें खोल दीं, घर में उजाला हो गया !…आईबापाचं छत्र हरवून आयुष्यात अंधार झालेल्या अनाथ पोरापोरींना सिंधुताईंनी आपल्या मायेच्या पंखांखाली घेतलं. कुठून आणि कसा सुरु झाला हा प्रेरणादायी प्रवास? चिंधी अभिमान साठे पासून सिंधुताई सपकाळ कशी घडली? हा प्रवास आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 15 ऑगस्टपासून ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम