मांजरेकर गाठ माझ्याशी आहे? संभाजी राजे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ नोव्हेबर २०२२ ‘हरहर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ यावरून वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की, सिनेमॅटिक लिबर्टी सध्या सुरू आहे ते ठीक आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाला हे चालू शकत नाही. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास झाला. महाराजांकडे आपण अस्मिता आणि प्रेरणा म्हणून बघतो. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काहीही इतिहास दाखवायचा का? असा प्रश्नही संभाजी राजे यांनी उपस्थित केला.

चित्रपट बनवता ही चांगली गोष्ट आहेत. पेंढारकर यांनी काय छान चित्रपट बनवले होते. मात्र आता लोकांना आवडतं म्हणून काही चित्रपट बनवायचे का? “वेडात मराठे वीर दौडले सात” काय तो पोशाख हे काय मावळे आहेत का? असा प्रश्न संभाजी राजे यांनी महेश मांजरेकर यांचे पुत्र सत्या मांजरेकर याचा फोटो दाखवून उपस्थित केला. या चित्रपटात कुठल्या दृष्टीने हा मावळा वाटतो, असंही संभाजी यांनी विचारलं.

दरम्यान इतिहासाचा विपर्यास करणारे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. माझी सूचना आहे की तुम्हाला ऐतिहासिक चित्रपट काढायचे आहे तर त्यासाठी ऐतिहासिक समिती नेमली पाहिजे, अशी मागणीही संभाजी राजे यांनी केली. इतिहासाचा विपर्यास होऊ देणार नाही. लोकांनी असे चित्रपट बघू नये, अस आवाहन करताना आपण सेन्सॉर बोर्डाला पत्र देणार असल्याचंही संभाजीराजे यांनी म्हटलं. तसेच शिवाजी महाराजांची भूमिका कोणीही करू शकतो. अक्षय कुमार असो किंवा दुसरा कुठलाही अभिनेता, असंही ते म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम