महाविकास आघाडीतील अनेक लोक संपर्कात ; शिंदे गटाच्या मंत्र्यांचा दावा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ मे २०२३ ।  राज्यातील तीन मोठे पक्ष असलेल्या महाविकास आघाडीत पुन्हा एकदा फुट पडणार असल्याची टीका शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

यावर आता शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गटात मोठी फूट ही त्यांची शंभरावी खोटी माहितीये, त्यांचा पोपट खोटया चिठ्ठ्या काढतो, आम्ही चांगले काम करत आहोत हे त्यांना बघवत नसल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे प्रकरणात शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलिसांनी त्यांना क्लिन चिट दिली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नसल्याचं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं आहे. या प्रकरणावर देखील शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट यांच्याबाबतीत योग्य ती चौकशी झाली आणि खरं ते समोर आलं, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. भाजपमध्ये आणि आमच्यात चांगल्या पद्धतीनं समन्वय असल्याचंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटावर निशाणा दरम्यान यावेळी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही चांगले काम करतो हे त्यांना बघवत नाही. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसात मिळतोय, ते हे करून शकले नाहीत म्हणून ते लोकांचं लक्ष विचलित करत आहेत. त्यांना राज्याशी काहीही देणं-घेणं नसल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम