मराठा आंदोलकांची घेणार भेट ; राज ठाकरे रवाना !

बातमी शेअर करा...

बातमीदार  | ४ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या चार दिवसापासून जालना जिल्ह्यातील सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. याच्या विरोधात संपूर्ण राज्यातुन विविध स्तरांवर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

या आंदोलनस्थळी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजीराजे छत्रपती , उदयनराजे भोसले, मंत्री गिरीश महाजन आदी नेत्यांनी भेट दिली आहे. त्यांच्यावर झालेल्या लाठीचार्जचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध होत आहे. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे लाठीचार्जच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. कालच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी फोनवरून संवाद देखील साधला होता. आता स्वतः राज ठाकरे या ठिकाणी जाऊन आंदोलकांची भेट घेणार असून ते जालन्यासाठी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी १० वाजता हि भेट होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम