मराठा सेवा संघाचा ३५ वा वर्धापन दिवस साजरा

बातमी शेअर करा...

पारोळा (प्रतिनिधी) पारोळा तालुका व पारोळा शहर मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा सेवा संघाचा ३५ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.शांताराम पाटील अध्यक्ष मराठा सेवा संघ पारोळा तालुका यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.सदर प्रसंगी मराठा सेवा संघाचे सचिव प्रा.जे.बी.पाटील यांनी मराठा सेवा संघ बद्दल माहिती सांगून मराठा संघ कस काम करते व स्थापने मागचे उद्दिष्ट सांगितले तसेच मराठा सेवा संघाची स्थापना पुरुषोत्तम खेडेकर यांनी एक सप्टेंबर १९९० साली करून मराठा बांधवांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले.

मराठा सेवा संघाचे ध्येय, उद्दिष्टे व विविध ३३ कक्ष, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, उद्योजक कक्ष, जगतगुरु तुकाराम महाराज साहित्य परिषद इ.द्वारे कशाप्रकारे सामाजिक कार्य केले जाते याविषयी सविस्तर माहिती दिली.

भविष्यात मराठा सेवा संघाच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा इ.विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाईल असे सांगितले.

सदर प्रसंगी मराठा सेवा संघ तालुका उपाध्यक्ष रविंद्र पाटील, सदस्य डॉ.योगेंद्र पवार, देविदास सोनवणे,मराठा सेवा संघ शहराध्यक्ष प्रतिक भूपेंद्र मराठे, सचिव सतिश माने, उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, सदस्य भुजंगराव मराठे व समाज बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम