मराठी अभिनेत्री लंडनमध्ये अवतरली अशा लुकमध्ये !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ मे २०२३ ।  मराठी टेलिव्हिजनमध्ये बराच काळ काम केल्यानंतर मराठी अभिनेत्री सायली संजीव ती आता चित्रपटांकडे वळली आहे. त्यामुळे ती सध्याची आघाडीची अभिनेत्री असून नुकताच तिचा ‘गोष्ट एका पैठणीची’ सिनेमा रिलीज झाला. सिनेमाचं आणि सायलीच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. नेहमी सोज्वळ रुपात दिसणाऱ्या सायलीचा आता एक बोल्ड फोटो व्हायरल होत आहे.

अभिनेत्री सायली संजीव ‘काहे दिया परदेस’ मालिकेमुळे घराघरात पोहोचली. सायलीला आजपर्यंत प्रेक्षकांनी कायम साध्या आणि सोज्वळ रुपातच बघितलं आहे. पण आता सायलीचा थेट बिकिनी घातलेला फोटो सध्या चर्चेत आहे. सायली ‘कैरी’ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेली आहे. लंडनमध्ये वेळ घालावतानाचे अनेक क्षण तिने कॅमेऱ्यात कैद केले आहेत. त्यातलाच एक क्षण म्हणजे स्विमिंग पूल जवळ बसलेला तिचा एक फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाची बिकीनी घातलेली दिसतेय. ‘इट्स पूल टाईम’ असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट असा हा फोटो आहे. सायलीने हा फोटो पोस्ट केला नसून स्टोरी ठेवली आहे. तरी तिचा हा फोटो बघून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या असणार. सायलीचा ‘कैरी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याचं शूट लंडनमध्ये सुरु आहे. शशांक केतकर आणि सिद्धार्थ जाधवही या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम