मराठी अभिनेत्रीच्या मुलाने बदलले नाव !
दै. बातमीदार । ७ जून २०२३ । राज्यातील मराठी सिनेसृष्टी एक नाव कुणीही व्यक्ती कधीच विसरू शकत नाही ते म्हणजे स्मिता पाटील. सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी स्मिता पाटीलनं फार लवकर या जगाचा निरोप घेतला. प्रेग्नंसी दरम्यान स्मिताचा मृत्यू झालं. स्मितानं प्रतीक या मुलाला जन्म दिला मात्र त्याचा सांभाळ करण्यासाठी ती या जगात राहिली नाही. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर आता सिनेसृष्टीत आपलं नाव कमावण्यासाठी प्रयत्न करतोय. प्रतीक बब्बरला मधुर भांडारकरच्या इंडिया लॉकडाऊन या सिनेमात आपण पाहिलं.
त्याचे अनेक आगामी प्रोजेक्ट येऊ घातले आहेत. दरम्यान प्रतिकनं त्याचं नाव बदलल्याचं पाहायला मिळालं आहे. प्रतिक बब्बर हे नाव तो आजवर लावत होता मात्र त्याने त्याच्या नावात बदल केला आहे. अभिनेता प्रतीक बब्बर सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याला टॅटूचं प्रचंड वेड आहे. त्याच्या शरिरावर अनेक ठिकाणी त्यानं टॅटू गोंदवून घेतले आहेत. स्मिता असं लिहिलेला टॅटू त्याच्या छातीवर त्यानं गोंदवून घेतला आहे. दरम्यान त्यानं त्याच्या नावात बदल केला आहे.
प्रतीकनं त्याच्या आईला अनोख्या पद्धतीनं श्रद्धाजली वाहिनी आहे असं म्हणू शकतो. प्रतीकनं त्याचं नाव बदललं असून ‘प्रतीक बब्बर’ ऐवजी ‘प्रतीक स्मिता बब्बर’ असं केलं आहे. हे नाव बदलण्यामागचं कारण देखील सांगितलं आहे.
डीएनएच्या वृत्तानुसार, प्रतीकनं सांगितलं की, “हे प्रकरण थोडं अंधविश्वास आणि भावुक आहे. माझं हे नवीन माझ्या आगामी सिनेमांमध्ये असेल. माझे वडील आणि माझा संपूर्ण परिवार, माझे दिवंगत आजी-आजोबा आणि माझी दिवंगत आई यांच्या आशिर्वादानं मी माझ्या नावाच्या मध्ये माझ्या आईचं नाव लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आईचं आडनाव आणि माझ्या वडिलांचं आडनाव मी माझ्या नावापुढे लावणार आहे. माझं स्क्रीनवरील नवीन नाव आता ‘प्रतीक पाटील बब्बर’ असं असेल”.
प्रतीक पुढे म्हणाला, “जेव्हा माझे नाव एखाद्या सिनेमाच्या क्रेडिटमध्ये किंवा कोठेही दिसते तेव्हा मला लोकांना आणि माझ्या प्रेक्षकांना त्यांच्या असाधारण आणि उल्लेखनीय वारशाचे स्मरण व्हावं, असं मला वाटतं. माझं नाव माझ्या आई-वडिलांच्या प्रतिभेची आणि महानतेची आठवण करून देईल. माझी आई माझ्या नावातून जिवंत राहिल. ती माझ्याबरोबर सदैव असेतच पण मी ज्या गोष्टींमध्ये माझं सर्वात बेस्ट देण्याचं प्रयत्न करेन त्यात माझी आई माझ्याबरोबर असेल”. प्रतीक शेवटी म्हणाल्या, “यंदा माझ्या आईला जाऊन 37 वर्ष झाली. ती आम्हाला सोडून गेली. पण आम्ही तिला विसरू शकलो नाही. तिला कोणीच विसरू नये असं मला वाटतं. माझी आई स्मिता पाटील माझ्या नावामुळे जिवंत राहि”.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम