मराठी प्रेक्षकांना ‘कलावती’ लावणार वेड !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ फेब्रुवारी २०२३ ।’वेड’, ‘वाळवी’ या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर मराठी सिनेसृष्टीला आता चांगले दिवस आलेत असेच म्हणावे लागेल. वेगवेगळ्या जॉनर मधील मराठी सिनेमे आता प्रेक्षकांना आपलेसे करत आहेत. आता रोमॅंटिक सिनेमांचा बादशहा असे ओळखले जाणारे संजय जाधव यांनी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. ‘कलावती’ असे या सिनेमाचे नाव आहे.

आजवर संजय जाधवचे ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, ‘लकी’, ‘चेकमेट’, ‘खारी बिस्किट’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘तमाशा लाईव्ह’ अशा वेगवेगळ्या जॉनर मधील सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता पहिल्यांदाच ते कलावतीच्या माध्यमातून हॉरर कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत. या सिनेमात तगडी स्टार कास्ट देखील दिसणार आहे. यात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, अभिजित चव्हाण, हरीश दुधाडे, ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे, संजय शेजवळ, नील साळेकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. अभिजीत गुरुने या सिनेमाची पटकथा लेखन केले आहे. तर अमेय खोपकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

अद्याप तरी कलावती या सिनेमात अमृता खानविलकर कोणती भूमिका साकारणार हे समोर आलेले नाही. मात्र नुकताच या सिनेमाचा पहिला पोस्टर आऊट झाला आहे. या पोस्टमध्ये अमृता खानविलकर मराठमोळ्या लुकमध्ये पाहायला मिळत आहे. तिच्या या लुक वरून चंद्रमुखी नंतर पुन्हा ती लावणीसम्राज्ञीच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर कलावती या सिनेमाच्या माध्यमातून अमृता खानविलकर आणि ओंकार भोजने ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओंकारला या बिग बजेट सिनेमातून चांगलीच संधी मिळाली आहे. जवळपास चार वर्षांनी संजय जाधव रुपेरी पडल्यावर सिनेमा घेऊन येत आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना या भव्य सिनेमाची उत्सुकता लागली आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम