
मराठी भाषा गौरव दिन आणि बक्षीस वितरण समारंभ टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात साजरा
टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने शाळेचे अध्यक्ष रविंद्र पाटील आणि संचालिका रुपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा जागर घालण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिन हा सुप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. विशेष म्हणजे यावर्षीचा हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरला, कारण काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या गौरवात अधिक वाढ झाली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती आणि वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध मराठी चारोळ्या, कविता आणि नाट्य सादरीकरण करत मराठी भाषेची गोडी अनुभवली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण पारोळा येथील खुला विचार मंच चे सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. खुला विचार मंच, पारोळा यांच्या हस्ते पाणपोई उद्घाटन करण्यात आले, ज्याचा फायदा संपूर्ण परिसरातील नागरिकांना होणार आहे.
कार्यक्रमास विधीतज्ञ तुषार पाटील, सुधाकर पाटील, महाळपूर सरपंच, दिपक अनुष्ठान, माजी नगर उपाध्यक्ष, अरुण चौधरी, माजी नगरसेवक, कैलास महाजन, माळी समाज अध्यक्ष, ईश्वर बाबा ठाकूर,आरोग्यदूत, गणेश पाटील, अभियंता, संजू नाना पाटील, माजी नगरसेवक, सचिन पाटील, शिक्षक, विलास महाजन तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते:
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापक पी. एस. पाटील, अजीम शेख, उपप्राचार्य कविता सूर्यवंशी, विभाग प्रमुख नम्रता बेडिस्कर, वृषाली पाटील, क्लार्क श्रीकांत खैरनार आणि संपूर्ण शिक्षकवृंद यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा नंदूरबारे यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम