राज्यात पुन्हा होणार मास्क सक्ती ; राज्यमंत्री डॉ.पवारांची माहिती !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ डिसेंबर २०२२ ।  चीनमध्ये कोरोनाचा स्फोट पाहायला मिळतोय. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर आहे. भारतातही विशेष काळजी घेतली जात आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

चीनच्या परिस्थितीवरून भारतात आधीच खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कालच मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी आज कोरोना संदर्भात निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. चीनमधील कोरोनाचा उद्रेक पाहता भारताची पुढची पावलं काय असतील, त्याची रूपरेषा काय असेल यासंदर्भात आज बैठकीत निर्णय घेतला जाईल.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणाल्या की, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात आपल्यातील अनेकांना जीव गमवावा लागला होता. संपूर्ण देश ठप्प झाला होता. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. भारताने 220 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांमधून भारतात संसर्ग पसरणार नाही याकडे सरकारचं लक्ष असेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम