‘मेरे चारों तरफ बम लगा है’ ; पुणे विमानतळावर खळबळ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ ऑगस्ट २०२३ राज्यातील गेल्या काही दिवसापासून दिल्लीसह मुंम्बई शहराला धमकी मिळण्याचे प्रकार सातत्याने सुरु असतांना नुकतेच पुणे विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्याने प्रशासन खळबळून जागे झाले होते. एका ७२ वर्षी वृद्ध प्रवाशी महिलेनं ही धमकी दिल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या महिलेवर विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील गुडगाव इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स परिसरातील सूर्यविहार येथील नीता प्रकाश कृपलानी (वय ७२) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विमानतळावर नीता कृपलानी ही महिला आली. तिने विमानतळावरील बूथमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिसांना ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असं सांगितलं. त्यामुळं तेथील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची झडती घेतली असता ती अफवा असल्याचं स्पष्ट झाले. या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी दीपाली बबनराव झावरे (रा. कलवड वस्ती, लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. आर. करपे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम