दै. बातमीदार । १८ ऑगस्ट २०२२ । जळगाव येथील रोटरी जळगाव मिडटाऊन व रायझिंग रायडर्स यांच्यातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. त्यात मिडटाऊनचे श्रीरंग पाटील यांनी लोकमान्य टिळकांची तर आर.एन. कुळकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका सादर केली. भास्कर जुनागडे यांनी संत गाडगेबाबांच्या भूमिकेद्वारे संदेश दिला.
सहप्रांतपाल डॉ. मुर्तुझा अमरेलीवाला यांच्या हस्ते व अध्यक्ष मनोज पाटील यांच्या उपस्थितीत रॅलीला प्रारंभ करण्यात आला. पावसात दोन्ही संस्थांचे स्त्री, पुरुष सदस्य दुचाकीवर स्वार होत सहभागी झाले होते. चारचाकी वाहनावर चित्ररथ साकारण्यात आला. १५० मुलांना स्वातंत्र्य सैनिकांचे पुस्तक, चॉकलेट, खेळणी, फुगे, हॅन्डबँड, तिरंगी शर्टपीन आदी साहित्य असलेले बँग ऑफ हप्पीनेसचे वितरण करण्यात आले.
रॅलीत रोटरी मिडटाऊनचे दिलीप गांधी, किशोर सुर्यवंशी, डॉ. ऊषा शर्मा, डॉ. प्रकाश चित्ते, सुनंदा देशमुख, शारदा पाटील, मृणाल चित्ते, रायसिंग रायडर्सचे संजय पणीकर, कुंदनकुमार बाविस्कर, हर्षल तावडे, जुझर शाकीर, डी.जे.शिवा, संध्या किशोर, प्रविण पाटील, स्वप्नील पाटील, दीपक थौरानी, इम्रान शेख आदिंसह रोटरी मिडटाऊन व रायझिंग रायडर्सच्या सदस्यांनी कुटुंबीयासह सहभाग घेतला. टॉवर चौकात पोलीस दलातर्फे या रॅलीचे स्वागत करण्यात आले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम