एमआयडीसी परिसरात गुरांची चोरी ; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

एमआयडीसी परिसरात गुरांची चोरी ; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातील महालक्ष्मी इंडस्ट्रिजच्या समोरून एका व्यापाऱ्याच्या मालकीची सुमारे ४० हजार रुपये किंमतीची दोन गायी आणि एक गोऱ्हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २५ ते २६ नोव्हेंबर या मध्यरात्री दरम्यान घडली. गुरे सकाळी ९ वाजता आढळून न आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन अशोक पाठक (४६), रा. रिंग रोड, जळगाव यांच्या मालकीची ही गुरे इंडस्ट्रिजसमोर बांधलेली होती. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचा माग काढत सर्व गुरे पळवून नेली. घटनेची माहिती मिळताच पाठक यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत २७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम