
जूनमध्ये या भाज्या लावल्यात होणार लाखो रुपयांची कमाई !
दै. बातमीदार । २९ मे २०२३ । देशातील अनेक लोकांचा उदरनिर्वाह हे शेतीवर असून ते पावसाच्या आगमन झाले कि, शेतीची कामे सुरु करीत असतात, पण काही लोक घराच्या आजूबाजूला असलेल्या जागेत थोडी फार प्रमाणात शेती करीत असतात. त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे. तसेच बेरोजगार तरुणांना देखील या बातमीतून अनेक फायदे होवू शकतील.
पालक : शेतकरी जूनमध्ये पालकाची लागवड करू शकतात. यासाठी शेतीची तीन-चार वेळा नांगरणी करा. जेणेकरून माती भुसभुसीत होईल. खात म्हणून शेतात गाईचे शेण टाकावे. जमीन समतोल करून घ्यावी. त्यानंतर पालकाचे बियाणे पेरावे. महिन्याभरानंतर पालक तयार होते. पालक कापून ती बाजारात विकता येते. बाजारात पालकाचे भाव २० ते ३० रुपये किलो असते. अशाप्रकारे तुम्ही पालकमधून पैसे कमवू शकता.
भेंडी आणि काकडी : जून महिन्यात भेंडी आणि काकडीची लागवड करावी. शेतकरी आता भेंडी किंवा काकडीची लागवड करत असतील तर ऑगस्टमध्ये त्याचे उत्पादन निघते. ऑक्टोबर महिन्यापर्यंत काकडी, भेडी तोडू शकता. पावसाळ्यात भेंडी ६० ते ८० रुपये किलो असते. काकडी ४० रुपये किलो असते. अशाप्रकारे शेतकरी चांगली कमाई करू शकतात. कारले, लवकीचे उत्पादन मिळते चाळीस दिवसांतकारले, लवकी : जून महिन्यात कारले, लवकी यांची लागवड करता येते. पावसाळ्यात याचे चांगले उत्पादन मिळते. याचे उत्पादन ४० दिवसानंतर मिळते. याचा अर्थ ४० दिवसानंतर भाजीपाला तोडता येईल.
वांगे, मिरची, टमाटर : पॉलीहाऊसमध्ये वांगे, मिरची आणि टमाटरची लागवड करता येऊ शकते. यातून चांगली कमाई होते. पावसाळ्यात टमाटरचे भाव चांगले असतात. यातून चांगली कमाई होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासून कामाला लागणे आवश्यक आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम