पाकिस्तानात सापडले कोट्यवधीचे चलन

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ सप्टेंबर २०२३

खराब अर्थव्यवस्था आणि महागाईशी झुंजत असलेल्या पाकिस्तानातील दोन शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांचे स्थानिक आणि विदेशी चलन सापडल्याचे वृत्त आहे. स्थानीक वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, रावळपिंडीतील एका प्लाझाच्या तळघरात इतके चलन सापडले की फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) अधिकारी आश्चर्यचकित झाले.

या तळघरात 13 डिजिटल लॉकर सापडल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. ते खुले करण्याचे प्रयत्न आतापर्यंत अयशस्वी झाले आहेत. याशिवाय झेलम शहरातही असेच तळघर आणि लॉकर सापडले आहेत. जप्त केलेल्या चलनाशिवाय लॉकरमध्ये विदेशी चलनही असल्याचे समजते. पाकिस्तानकडे सध्या एकूण 8 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा आहे. त्यापैकी 3 अब्ज डॉलर आय एम एफ कडून, 2 अब्ज डॉलर सौदी अरेबियाकडून आणि प्रत्येकी 1 अब्ज डॉलर यु ए ई आणि चीनकडून आहेत. जूनमध्ये चलनवाढीचा दर सुमारे 40% होता. त्यानंतर सरकारने आकडेवारी जाहीर केली नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम