
मंत्री आठवलेंनी पवारांना दिली मुख्यमंत्री पदाची ऑफर !
दै. बातमीदार । १३ एप्रिल २०२३ । राज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार दोन दिवस नॉट रिचेबल होते त्यात अंजली दमानिया यांनी पवार हे भाजप सोबत जाणार असल्याचे ट्वीट केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यावर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी थेट अजित पवार यांना ऑफर दिली आहे.
या चर्चेदरम्यान आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवारांना खास ऑफर दिली आहे. त्यांनी अजित पवार त्यांच्या पक्षात गेले तर आनंदच होईल असेही आठवले म्हणाले आहेत. अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. पवारसाहेबांनी त्यांना अनेक पदं दिली आहेत. मध्यंतरी अजित पवार आजारी होते म्हणून नॅाट रिचेबल होते. मला वाटत नाही ते भाजपात जातील. ते देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र आहेत, म्हणून त्यांनी एकदा पहाटे शपथ घेतली होती. पण आता तसं होणार नाही. पुढे बोलताना आठवले म्हणाले की, अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच होईल. आम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर ती त्यांना देऊ, असं आश्वासनही रामदास आठवले यांनी दिलं आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम