मंत्री गडकरी पंतप्रधानपदाला न्याय देतील ; शिंदे गटातील आमदाराचे विधान !
दै. बातमीदार । २९ जानेवारी २०२३ । राज्यातील भाजपसोबत सत्ता स्थापन करणारे शिंदे गटाचे नेत्यांनी आता मंत्री गडकरी यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भविष्यात पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देतील, असे मत आमदार शहाजी पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. गडकरींच्या नेतृत्वावर भाष्य करताना त्यांनी सध्या देशाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वंचित आणि शिवसेनेच्या युतीमुळे वाद निर्माण झाला आहे. सोलापुरात एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. शहाजी पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आमदार शहाजी पाटील म्हणाले की, भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या कारभाराबाबत जनता समाधानी आणि सुखी आहे. त्यामुळे शरद पवारांनी यासंबंधी केलेले विधान आपल्याला मान्य नाही, असे नमूद करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रंदिवस जनतेसाठी कष्ट करत असल्याचे मत व्यक्त केले. शिवसेनेच्या आणि वंचित बहूजन आघाडीच्या युतीमुळे काही फरक पडणार नाही, असा दावा शहाजी पाटील यांनी केला आहे. तर लोकसभेला शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वातील युतीला बहूमत मिळेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
आमदार शहाजी पाटील म्हणाले की, शिवसेना आणि वचंत बहूजन आघाडीची युती ही तत्व सोडून करण्यात आली आहे. आगामी निवडणुका कशा लढवाव्यात यासाठी त्याचे हे केविलवाणे प्रयत्न सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर राजकारणात वारस हा विचारांचा ठरत असतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा खरा वारसा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, असे सांगताना त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने त्यांना स्विकारले आहे. असे म्हणत आमदार शहाजी पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रतित्युर दिले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम