मंत्री गडकरींची मोठी घोषणा : आता नागपूर-पुणे अवघ्या ६ तासात !
दै. बातमीदार । ११ डिसेंबर २०२२ । राज्यातील महत्वाचा मानला जाणाऱ्या प्रकल्पाची आज मुहुर्तुमेढ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रोवली गेली, नागपूरमध्ये एम्स उद्घाटनं पंतप्रधान मोदींच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडलं, या सोहळ्यात मंत्री नितीन गडकरी म्हणाले कि, सध्या नागपूर ते पुणे रस्ता प्रवास हा सुमारे १७ तासांचा आहे. पण हा प्रवासाचा वेळ केवळ सहा तासांपर्यंत कमी करण्याचा संकल्प मी केला आहे. त्यानुसार नागपूर ते पुणे केवळ सहा तासांत पोहोचता येणार आहे.
गडकरी म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही औरंगाबादहून पुण्यापर्यंत हायवे बनवत आहोत. लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल. ज्यामुळं नागपूरहून पुणे केवळ सहा तासात पोहोचता येईल, हा माझा विश्वास आहे.” याशिवाय विशेषतः महाराष्ट्रात आम्ही सहा एक्सप्रेसवे बनवत आहोत. यामध्ये सूरत-चेन्नई महामार्गाचा समावेश आहे. यामध्ये साऊथकडे जाण्यासाठी मुंबई-पुण्यातून ट्रॅफिक जातं पण नव्या महामार्गामुळं प्रदुषणापासून या शहरांना मुक्ती मिळणार आहे. त्याचबरोबर सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-सोलापूर-बंगळुरु-त्रिवेंद्रम-चेन्नई-हैदराबाद असाही एक साऊथमध्ये जाणारा मार्ग असणार आहे. तसेच इंदूर-हैदराबाद, हैदराबाद- रायपूर, नागपूर-विजयवाडा, पुणे-बंगळुरु, पुणे-औरंगाबाद हे ७५,००० कोटी रुपयांचे ग्रीन एक्स्प्रेस हायवे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली तयार होणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम