मंत्री पाटलांनी मानले आंबेडकरांचे आभार म्हणाले बी टीम ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ जानेवारी २०२३ । राज्यातील ठाकरे गटासोबत युती असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर यांनी नुकतेच शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर त्या वक्तव्याला भाजप नेते समर्थन देवू लागले आहे. तर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी आज त्यांचे कौतुक देखील केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ED, CBI व प्राप्तिकर विभाग या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे आपल्याला वाटत नाही. जे करत आहेत, तेच मी त्यांच्या जागी असलो तर केले असते, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केले होते. त्यांच्या या कथित भाजपधार्जिन्या विधानाबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे या विधानाबद्दल आभार मानलेत. ते कसबा पेठ पोटनिवडणुकीविषयी पुण्यात आयोजित एका बैठकीत बोलत होते.

चंद्रकांत पाटील याविषयी काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले – प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. देशात 2014 पासून नरेंद्र मोदींचे सरकार आहेत. तेव्हापासून आजपर्यंत देशातील कोणत्याही राज्यात विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लादण्यात आली नाही. याऊलट काँग्रेसच्या काळात 19 वेळा विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लादली गेली. मोदींच्या कार्यकाळात असे करता आले असते. पण कुठे लोकशाही आणि कुठे हुकूमशाही. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे का?, असा थेट प्रश्न केला असता त्यांनी हसत पुढील उत्तर दिले. ते म्हणाले – फार पूर्वी पाऊस पडला नाही, तर संघाचा हात आहे. अतिवृष्टी झाली तर संघाचा हात आहे. तसचे अलीकडच्या काळात काही झाले तरी त्यात भाजपचा हात आहे असे म्हटले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यासाठी पहाटेच्या शपथविधीची खेळी खेळण्यामागे पवारांचा हात असल्याचे विधान केले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांनी अद्याप भाष्य केले नाही. याविषयी चंद्रकांत पाटील यांना छेडले असता ते म्हणाले – काही प्रश्नांची उत्तरे केव्हाच मिळत नसतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनाक्रमावर एक पुस्तक लिहितील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम