मंत्री रावसाहेब दानवेंचे मोठे विधान ; दोन्ही निवडणूक सोबत होणार !
दै. बातमीदार । २७ डिसेंबर २०२२ । फुलंब्री येथे आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी जोरदार फटकेबाजी केली. आपल्या राजकीय करियर बद्दल बोलताना दानवेंनी अनेक किस्से सांगितले. मात्र, याच वेळी गावातील राजकारण याबद्दल नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना अनेक सल्लेही दिले.
भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात दानवे यांनी हे विधान केलं आहे.
भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, हल्लीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. सोबतच राजकीय घडामोडी होऊन इतर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला आहे. दानवे यांचे या विधानाने राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून मध्याविधी निवडणूक लागण्याच्या चर्चा सुरू असतानाच दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम