मंत्री सत्तार पुन्हा वक्तव्याने चर्चेत ; पहा काय म्हणाले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ सप्टेंबर २०२३ | राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्याने चर्चेत येत असतात. आज देखील ते चर्चेत आले आहे.

अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले कि, लोक मला विचारतात की, तुम्ही प्रत्येक मंत्रिमंडळात कसे असता? माझ्या नावात सत्ता असल्यामुळे मी सत्तेत असतो. आमच्या डबल इंजिन सरकारला आता तिसरे इंजिन जोडले आहे. मी सगळीकडे असतो कारण माझा कुणाशाही पर्मनंट करार नसतो. कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, दरम्यान अब्दुल सत्तार पुढे बोलताना म्हणाले की, आम्हाला अपात्र ठरविण्यासाठी दानवे सारखे मागे लागले आहेत. मात्र, एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला त्याचे भावना मांडण्याची मुभा असते. म्हणूनच हा देश लोकशाही आहे’, असे सत्तार म्हणाले. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे ते कळतच नाही. जे ट्रिपल इंजिन सरकारमध्ये आले त्यांच्या मतदारसंघात कामे सुरू आहेत,’ असा दावाही सत्तार यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा बँकेची सभा झाली. यावेळी सत्तार यांनी राजकीय टोलेबाजी केली.

अब्दुल सत्तार म्हणाले की, लोक मला विचारतात की, तुम्ही प्रत्येक मंत्रिमंडळात कसे असता? माझ्या नावातून ‘र’ काढून टाकले की, माझ्या नावातच ‘सत्ता’ येते. माझा कुणाशीच पर्मनंट करार नसतो, म्हणून मी नेहमी सत्तेत असतो, असे विधान मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. यामुळे सभागृहात एकच हाशा पिकला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम