आमदार चव्हाण यांचे फेसबुक पेज व अकाउंट हॅक!

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ सप्टेंबर २०२२ । भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव येथील आमदार मंगेश रमेश चव्हाण यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान अज्ञात हॅकर इसमाने भाजप आमदार मंगेश रमेश चव्हाण यांचे “Mangesh Chavan” हे फेसबुक अकाउंट व “Mangesh Chavan-मंगेश चव्हाण” हे फेसबुक पेज हॅक करत त्यावर बुरखा घातलेला चाकूधारी इसमाचा धमकी देणारा मजकूर व एक बदनामी करणारा फोटो पोस्ट केला. तसेच चव्हाण यांच्या फेसबुक पोस्ट्सही हटवून टाकल्या.

याचबरोबर “Mangesh Chavan-मंगेश चव्हाण” या फेसबुक पेजशी लिंक असलेले गोपाल म्हस्के यांच्या क्रेडिट कार्डातुन ओटीपीशिवाय ७० हजार ८०० रुपयेही काढून घेण्यात आले.

दरम्यान, या संदर्भात गोपाल शिवाजी म्हस्के (रा.टाकळी प्र.चा. ता. चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम