शिंदे गटाच्या आमदाराने धरले भाजप आमदाराचे पाय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ फेब्रुवारी २०२३ । शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर प्रकाशझोतात आलेले संतोष बांगर यापूर्वी अनेकवेळा आपली वादग्रस्त विधाने केली आहेत. आपल्या भूमिकांमुळे ते कायम चर्चेत राहीले आहेत. संतोष बांगर शिंदे गटात सर्वात शेवटी दाखल झाले. सुरुवातीला संतोष बांगर यांनी जाहीर कार्यक्रमात आपण उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही, अशी घोषणा केली होती.

तर आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. यावेळी अधिवेशनात येताना प्रवेशद्वाराजवळच संतोष बांगर यांनी आशिष शेलार यांच्या थेट पाया पडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. या 55 आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेकडूनही जोरदार तयारी सुरु आहे.

मात्र आज अधिवेशनादरम्यानच्या एका व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. भाजपचे नेते आशिष शेलार विधिमंडळ परिसरात आले. तेव्हा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर समोर दिसताच शेलार यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. बांगर यांनी हातात हात दिला. याशिवाय ते थेट शेलार यांच्या पायाच पडले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम