ठाकरे गटाच्या आमदारांनी फडणवीसांचा केला भावी पंतप्रधान असा उल्लेख !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ मार्च २०२३ । राज्यातील अर्थ संकल्पीय अधिवेशन गेल्या चार दिवसापासून सुरु आहे. यात सताधारी व विरोधक एकमेकावर चांगलेच आक्रमक होताना राज्य बघत आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाचे आक्रमक नेते म्हणून भास्कर जाधव यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. राज्यात सत्ताबदल झाल्यापासून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपवर टीका करताना ते अधिकच आक्रमक होतात.

याच आक्रमक भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो असे म्हटले. पण, त्यांनी सुडाचे राजकारण करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. काँग्रेस नेते सत्तेचा पाळणा घेऊनच जन्माला आले होते. मात्र, भाजपचे तसे नाही. भाजपची तब्बल ५० वर्षे विरोधी पक्षातच गेली आहेत हे लक्षात ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम