श्री दत्त जयंतीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात महायाग…. ११ मानकऱ्यांनी केले सपत्नीक विधिवत पूजन..
अमळनेर(आबिद शेख) येथील श्री मंगळग्रह मंदिरात मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात श्री दत्त जयंतीनिमित्त ७ डिसेंबर रोजी महायागाची महापूजा ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…’चा गजर करीत विधिवतरित्या जल्लोषात पार पडली. दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत झालेल्या महायागात ११ मानकरी सपत्नीक सहभागी झाले होते. अतिशय चैतन्य व भक्तिमय वातावरणात दिवसभर हजारो भाविकांच्या साक्षीने हा महायाग सोहळा झाला.
प्रारंभी भगवान श्री दत्तात्रेयांची प्रतिमा अतिशय विलोभनीय स्वरूपात सजावट करून या मानकऱ्यांच्या हस्ते प्रतिष्ठापित करण्यात आली. भगवान श्री दत्तात्रेयांचा पाळणा अतिशय आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेला होता. आवाहन पूजा करण्यात आली. ईशान्य रुद्र मंडल, सूर्यादि नवग्रह मंडल, क्षेत्रपाल मंडल, सर्वतो भद्र मंडल, चतुःषष्ट योगिनी मंडल, वास्तु मंडल, गौर्यादि मातृका मंडल स्थापित करण्यात आले. सायंकाळी सातच्या सुमारास पूर्णाहुती होऊन महाआरतीने महायागाचा समारोप झाला.
*महायागाच्या मानक-यांची नावे अशी:*
अनुप भोसले (नाशिक), प्रा. धनंजय चौधरी, रावसाहेब गंगाराम पाटील (पहिलवान), अमोल पिंगळे, जितेंद्र प्रमोद गुंजाळ, सीए. रूपेश मकवाना, ॲड. मुन्नाभाऊ बागूल, हेमंत माधवराव भांडारकर, शितल देशमुख, प्रभाकर कोठावदे व मंगळग्रह सेवा संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील.
मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. त्यांना पुजारी तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, मेहुल कुलकर्णी यांनी सहकार्य केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, डी. ए. सोनवणे, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, प्रशासन अधिकारी भरत पाटील यांच्यासह मंदिरातील सेवेक-यांनी महायाग सोहळा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम