मनसे अध्यक्ष ठाकरे अधिवेशनात ? चर्चेना उधान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ डिसेंबर २०२२ ।  राज्यात हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. त्यासाठी राज्यातील मंत्र्यासह नेते या अधिवेशनात येत आहे. तर राजकीय पक्षाचे मंडळीदेखील अधिवेशन परिसरात येवून आपली उपस्थिती लावत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने ते स्थानिक नेत्यांसोबत भेट घेत चर्चा करणार आहेत. यासोबतच हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज ठाकरे नागपुरात जात असल्याने सर्वाचे लक्ष त्यांच्या या दौऱ्याकडे लागले आहे. नागपूर दौऱ्यात राज ठाकरे कुणाची भेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये राज ठाकरेंचा हा दुसरा नागपूर दौरा आहे. मागील वेळी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपच्या विरोधात लढणार असे म्हणताना भाजपवर निशाणा साधला होता. या दौऱ्यात मनसे प्रमुखांच्या हस्ते नवीन शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्राचे वाटप होणार आहे. तर स्थानिक समस्या काय आहेत हे जाणून घेत त्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना कराव्या यासंदर्भात चर्चा ही होणार आहे. 3 महिन्यापूर्वी राज ठाकरेंनी नागपुरात राज्यातल्या अस्थिर राजकीय परिस्थितीला संधी म्हणून बघा, अशी सूचना मनसैनिकांना केली होती. यावेळी आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मनसैनिकांनी तयारीला लागण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी दिले. यानंतर आता राज ठाकरे नागपुरात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने सर्वच पक्षातील नेते हे संध्या नागपुरात आहेत. तर आज मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील नागपुरात दाखल होणार असल्याने या दौऱ्याला महत्त्व आले आहे. या दौऱ्यात राज ठाकरे कोणाची भेट घेणार का? याबाबतची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदांरासह बंड केल्यापासून राज ठाकरेंसोबत जवळीक वाढवली आहे. तर भाजप नेतेही राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात चर्चा करत आहेत. सप्टेंबर महिन्यात राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तर एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे एकत्र आले होते. त्यामुळे आता या दौऱ्यात कोणत्या राजकीय नेत्यांची भेट घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात दौरे करत आहेत. यातच त्यांनी सप्टेंबर महिन्यात नागपुरात जात 5 जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा घेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर पक्षबांदणीसाठी राज ठाकरेंचा दौरा असल्याचेही बोलले जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम