महिलांना देतंय मोदी सरकार पाच हजार ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ मे २०२३ ।  देशातील नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना याचा फायदा होत आहे. त्यात मोदी सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांना पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळत आहे.

देशातील गर्भवती महिलांना पोषक अन्न मिळावे आणि देशातील कुपोषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष पाऊले उचलली जात आहेत. गरोदर महिलांच्या औषधाचा खर्च कमी करण्यासाठी आणि वैद्यकीय उपचार देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यानुसार, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून पाच हजार रूपयांची रक्कम मिळवता येऊ शकते. ही महिलांसाठी महत्वपूर्ण अशी एक योजना आहे. या योजनेचा फायदा फक्त गरोदर महिलांना घेता येऊ शकतो. गर्भवती महिला आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही योजना आहे.

या योजनेचा उद्देश काय?
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ हा गरोदर महिलांना मिळू शकतो. या गरोदर महिलांमधील कुपोषण दूर करणे, त्यांना योग्य उपचार आणि औषधांचा खर्च देणे हा आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना एकूण पाच हजार रूपये रोख स्वरूपात दिले जातात. गरोदर महिलांना या योजनेत रजिस्ट्रेशन करताना 1000 रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. त्यानंतर सहाव्या महिन्यात किमान एका तपासणीनंतर 2000 रुपये तर तिसऱ्यांदा बाळाच्या जन्मानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर 2000 रूपयांचा शेवटचा हप्ता दिला जातो. अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने हे पाच हजार रूपये दिले जातात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम