
पुण्यात मोदी विरोधक एकवटले ; काळे कपडे परिधान !
बातमीदार | १ ऑगस्ट २०२३ | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर येत असून त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तर दुसरीकडे दोन मेट्रो मार्गाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असले तरी या दौऱ्याला पुण्यातील विविध सामाजिक संघटना तसेच काँग्रेसच्यावतीनं विरोध करण्यात येत आहे. काळे कपडे परिधान करत तसेच काळे झेंडे दाखवत मोदींना जोरदार विरोध दर्शविण्यात येत आहे.
काँग्रेससह इंडिया फ्रन्टच्यावतीनं युक्रांद, हमाल पंचायत आणि तर सामाजिक संघटनांनी महात्मा फुले मंडई परिसरात सकाळपासून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोधात करण्यात येत आहे. कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, रमेश बागवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काळे फ्लेक्स परिधान करत आंदोलन केलं. यावेळी त्यांनी ‘मोदी गो बॅक’च्या घोषणाही दिल्या. तसेच ‘मन की बात मत करो, काम की बात करो’ असे फलक दाखवण्यात आले.
दरम्यान, दुसरीकडं सामाजिक संघटनांच्यावतीनं देखील मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हातात पोस्टर घेऊन त्यांचा निषेध नोंदवला. यावेळी युक्रांदचे प्रमुख कुमार सप्तर्षी म्हणाले, “लोकमान्यांचं नाव मोदींच्या नावाला चिकटवणं हे गैर आहे. लोकमान्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही. दुसरी गोष्ट अशी की, लोकशाहीचे कुठलेही संकेत ते पाळत नाहीत. लोकसभेत ते येत नाहीत, बोलत नाहीत. मणिपूर जळत होतं, त्यांनी त्यावरही काही केलं नाही. त्यामुळं त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे”

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम