मोदी ७७ दिवसांनी ‘या’ घटनेवर बोलले ; प्रियंका गांधी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ जुलै २०२३ ।  देशातील मणिपूरमध्ये महिलांबरोबर घडलेल्या घटनेनंतर अवघ्या देशातून संतापाची लाट समोर येत आहे. त्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मणिपूर दोन महिन्यांपासून जळत असताना मोदी 77 दिवसांनी यावर बोलले आणि त्यातही राजकारण केले असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

मेईतेई आणि कुकी यांच्यातील वाद विकोपाला पोहोचल्याने सुमारे दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. त्यात बुधवारी महिलांची धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात एकच संतापाची लाट उसळली. त्यानंतर गुरुवारी संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरबाबत निवेदन केलं. त्यावरून प्रियंका गांधींनी मोदींवर टीका केली आहे.

“दोन महिन्यांपासून संपूर्ण मणिपूर राज्य हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. लोकांची घरे जाळली जात आहे. एकमेकांच्या हत्या केल्या जात आहेत. मुलांच्या डोक्यावर छत राहिले नाही. असे असताना आपले पंतप्रधान 77 दिवस काहीही बोलले नाही. कारवाई सोडाच पण एक शब्दही काढला नाही. एक अत्यंत भयावह व्हिडिओ व्हायरल झाल्याने नाईलाजाने त्यांना बोलावे लागले. त्यामुळे नाइलाजाने ते एक वाक्य बोलले आणि त्या एका वाक्यातही त्यांनी राजकारण केले. त्या वाक्यातही त्यांनी ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आहेत, त्यांची नावे त्यांनी घेतली,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम