पंतप्रधान मोदींचा जगभरात डंका ; नऊ देशांनी केला सर्वोच्च नागरी सन्मान !
दै. बातमीदार । २३ मे २०२३ । गेल्या काही दिवसांपासून विदेश दौऱ्यावर असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेक देशांच्या प्रतिनिधी आणि नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर त्यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी आणि पापुआ न्यू गिनी देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे. त्यामुळे साहजिकच देशाचे पंतप्रधान मोदी यांचा डंका जगभर वाजत आहे.
आतापर्यंत नऊ देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2016 मध्ये सौदी अरेबियाने पंतप्रधान मोदींना ‘अब्दुलाझीझ अल सौद’ हा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2016 साली मोदींना ‘अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार’ या अफगाणिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार हा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. या पुरस्काराचे नाव अफगाणिस्तानचे राष्ट्रीय प्रमुख अमानुल्लाह खान (गाजी) यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. 2018 साली मोदी फिलिस्तीनच्या दौऱ्यावर असताना त्यांना ‘ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानंतर 2019 साली संयुक्त अरब अमीरातला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ जायद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम