जगभरात मोदींचा डंका : सर्वाधिक फॉलोवर्समध्ये मोदींचा समावेश !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ फेब्रुवारी २०२३ । जगभरातील ट्वीटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर लोकप्रिय असलेल्या लोकांची एक यादी आता प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा पहिला नंबर आहे. तर पंतप्रदान नरेंद्र मोदीसुद्धा या यादीमध्ये पहिल्या १० मध्ये आहेत.

ट्वीटरवरच्या फॉलोवर्सच्या संख्येच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे. यात पहिल्या १० क्रमांकांमध्ये केवळ दोन राजकीय व्यक्तीमत्त्वांचा समावेश आहे. यातलं एक पहिल्या क्रमांकाचं नाव म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा. तर त्यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांच्या यादीत समावेश आहे.

भारताचे पंतप्रधान वगळता, कोणताही राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान किंवा मोठ्या नेत्याच्या फॉलोवर्सची संख्या पंतप्रधान मोदींच्या फॉलोवर्सपेक्षा जास्त नाही. सर्वाधिक फॉलोवर्सच्या या यादीत इलॉन मस्कचाही समावेश आहे. आपल्या पदावरुन पायउतार होऊन ओबामा यांना आता सहाहून अधिक वर्षे लोटली. पण तरीही त्यांची लोकप्रियता कायम आहे. त्यांना १३ कोटी ३५ लाख लोक फॉलो करतात.

तर या यादीमध्ये इलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहे. मस्कचे सध्या १२ कोटी ७१ लाख फॉलोवर्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पॉप सिंग जस्टिन बीबर आहे, तर प्रसिद्ध गायिका केटी पेरी चौथ्या क्रमांकावर आहे. गायिका रिहाना आणि फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हे दोघे अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. सातव्या क्रमांकावर गायिका टेलर स्विफ्ट असून आठवा क्रमांक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लागतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम