मोहित कंबोजांना मिळाली क्लीनचिट ; पोलिसांना पुरावे मिळालेच नाही !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ डिसेंबर २०२२ । मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. संजय पांडे आणि मोहित कंबोज यांच्यातील वाद जोरदार चर्चेत आल्यानंतर संजय पांडे यांनाच अटक झाली होती. आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर मोहित कंबोज यांनी थेट पांडे यांना आव्हान दिले होते. तर पांडे यांचेच आर्थिक घोटाळे कंबोज यांनी बाहेर काढले होते. कथित बॅंक घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज यांना EOW करून पुर्णपणे क्लीनचिट देण्यात आली आहे. तर आर्म्स ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही कंबोज यांची सुटका झाली आहे. मुंबई पोलिसांकडून या दोन्ही प्रकरणात कंबोज यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने जूनमध्ये गुन्हा दाखल केला होता. मोहित कंबोज यांच्या कंपनीने 2011 ते 2015 या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या बँकेची फसवणूक करत कर्ज बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. दरम्यान, मोहित कंबोज यांनी स्वतः ट्विट करून आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. बँकेकडून कर्ज घेतले पण कर्जाची ही रक्कम ज्यासाठी घेतली होती त्या कामासाठी न वापरता इतरत्र वापरल्याचा मोहित कंबोज यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर जल्लोषादरम्यान तलवार काढल्याप्रकरणी भाजपच्या मोहित कंबोज विरोधात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जमीन खरेदी प्रकरणात ईडीने मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंबोज यांच्या सांताक्रूझ येथील राहत्या घराजवळ फटाके फोडले, त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीदरम्यानच कंबोज यांनी तलवार काढली, तलवारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम